Quantcast
Channel: तंत्रज्ञान » Mobile Technology
Viewing all articles
Browse latest Browse all 4

3G

$
0
0
नमस्कार मंडळी,
काहीच महिन्याआधी पार पडलेले 3G Auction आणि आता सरकारचा चाललेला हो-नाहीचा सावळा गोंधळ. त्यामुळे आपल्या मनात 3G  हे नक्की काय भानगड आहे, असा प्रश्न उद्भवलाच असेल. आज, आपण याबद्दलच काही माहिती घेऊ.
(मायाजाळावरुन साभार)
तोंडओळख :
जेव्हा आपण 3 G म्हणत आहोत, तेव्हा नक्कीच त्याआधीचे आकडे पण असणार. हे अगदी बरोबर आहे. 3G च्या आधी 1G, 2G व काही तंत्रज्ञान्यान 0G या प्रवर्गात ही मोडते. येथे 3G म्हणजे 3rd Generation/३ री पीढी. 3G ला International Mobile Telecommunications-2000 (IMT–2000) म्हणतात. यांचे मापक International Telecommunication Union ही आंतराष्ट्रीय समिती ठरवते. ही सेवा या शतकाच्या सुरुवातीला उदयास आली.
इतिहास :
3G  च्या आधी 1G व 2G  हे तंत्रज्ञान होते. 1 G चे पहिले व्यावसायिक उत्पादन जापानच्या NTT  या कंपनीने १९७९ ला केले. 1G  हे तंत्रज्ञान फ़ार महत्वाचं होत. कारण या आधीच्या दुरध्वनी हा रेडीओ वा तारांनी जोडलेला होता. 1G मुळेच दुरध्वनी यंत्रणा खर्या अर्थाने तार मुक्त झाली. त्यानंतर त्यात प्रगती होऊन 2G चा जन्म झाला. १९९० साली हे तंत्रज्ञान आले. यात व आधीच्या तंत्रज्ञान मोठा फ़रक म्हणजे आधिचे यंत्रणा Analog transmission होती, ती आता digital transmission झाली होती. त्या़च प्रमाणे यंत्राणा फ़ार प्रगत व GSM चा वापर करत होती. यानंतर मे, २००१ ला जापानच्या NTT  DoCoMo या कंपनीने 3G सेवा सुरु केली.
भारतात 3g चे आगमण २००८ ला BSNL  तर्फ़े पट्ना, बिहार येथे झाले.
गरज :
2G सेवा चांगली  असली तरी तिचे काही तोटे होते. जसे की, कमी वेग.त्यांचा transmission वेग 64 to 200 Kbps होता. त्याच प्रमाणे ही यंत्रणा तयार करण्याच उद्दिष्ठ होत की, दुरध्वनीवर माहितीची देवाण-घेवाण जास्त वेगाने व त्याच वेळी कॉल/बोलणे ही सुरु राहिले पाहिजे. हे उद्दिष्ठ 3G
पुर्ण करते.
तंत्रज्ञान :
3G यंत्रणात जास्त वेगाने ( 200 Kbps च्या वर) व कुठुनही, कोणीही, कधीही वापरु शकतो. यासाठी याचे ठिकाण एकाच जागेवर राहते. त्याच प्रमाणे मायाजाळाशी जोडणारी व व्यवसायसाठी असो वा शिक्षणासाठी नवीन दारे उघणारी आहे. याचा वापर आपण दोन ठिकाणची माहिती जास्त सोप्या पध्दतीने व वेगाने करु शकतो. त्याच प्रमाणे या यंत्रणेची सुरक्षा पातळी जास्त आहे.
वैशिष्टे :
- दुरध्वनी कॉल/ फ़ॅक्स.
- ग्लोबल रोमिंग.
- मोठ्या आकारचे विपत्राची देवाण-घेवाण.
- वेगवान मायाजाळ.
- ऑनलाइन नकाशे.
- चित्रफ़ित संवाद.
- दुरदर्शन दुरध्वनीवर.
तोटे :
ही सेवा कितिही चांगली असली तरी ,ती आपल्या वाढत्या ,मागणी समोर कमीच पडणार आहे. यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे याची किंमत जास्त आहे. त्या़च प्रमाणे याचा तेवढा प्रसार न झाल्याने देवाण-घेवाण करण्यात त्रास होतो.
भविष्य :
3G च्या पुढची पीढी/generation ही 3gpp वा 4G आहे. काही भागात pre-4g ही सेवा सुरु झाली आहे.

- तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)


Tagged: 3G, DoCoMo, GSM, IMT 2000, Mobiles

Viewing all articles
Browse latest Browse all 4

Latest Images

Trending Articles





Latest Images